'गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, राज्यपाल कोश्यारींचं मोठं विधान

0

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. गेले अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात आता आणखीन वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

यावेळी कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ही राज्यपालांवरती अनेकदा टीकेचे बांध सोडले गेले आहेत. यावेळी राज्यपाल म्हणाले होते की, मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे.


This news is co provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top