भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर...

0

राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार भालाफेकमध्ये सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला अलीकडील जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दुखापत झाली होती. आयओए सरचिटणीस राजीव मेहता यांनी नीरजच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे. आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “नीरज चोप्रा २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेणार नाही. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे तो तंदुरुस्त नाही. त्यानी आम्हाला याबद्दल माहिती दिली आहे.” जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात नीरजला दुखापत झाली होती. कार्यक्रमादरम्यान तो मांडीवर पट्टी बांधलेला दिसला होता. यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले होते. ज्यामध्ये कंबरेच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. खुद्द नीरजनेही फायनलनंतर सांगितले की, चौथ्या थ्रोनंतर मला थोडे दुखणे जाणवले होते. त्यानंतर मी पट्टी बांधली आणि पुढची फेक केली. जास्त त्रास होत आहे त्यामुळे कळत नाही ही दुखापत किती गंभीर आहे, हे तपासानंतरच समजेल नीरज चोप्राने २०१८ गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला खेळाडू ठरला होता. अशा स्थितीत त्याच्या अनुपस्थितीत यावेळी भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे सोपे जाणार नाही.

This news is co provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top