भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२

0

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना होत आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मेग लॅनिंगकडे आहे. भारतीय महिला संघाची सध्याची लय पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने विजय मिळवल्यास पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या लढतीत भारतावर कमी दडपण असेल.

भारताला पहिला धक्का
स्मृती मंधानाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. स्मृती २४ धावा करून बाद झाली.
तीन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा
तीन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा झाल्या आहेत. भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे.

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, हरलीन देओल

ऑस्ट्रेलिया महिला संघ: एलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, जेस जोनासन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन, ग्रेस हॅरिस.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top