पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन ʼ२८ ऑगस्टला.

0

"पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन" २८ ऑगस्टला

- डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळे यांची माहिती

- 31 जुलै पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन 

- आजअखेर सुमारे 500 हून अधिक स्पर्धकांची विक्रमी नोंदणी
कोल्हापूर : नंदकुमार तेली

"ऐतिहासिक गड किल्ले जतन-संवर्धन व आरोग्यासाठी धावा" हा संदेश देण्यासाठी "पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन"चे आयोजन करण्यात आले आहे. 
ही मॅरेथॉन डेक्कन स्पोर्ट्स क्लब- असोसिएशन व शांतिनिकेतन यांच्या वतीने दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे., अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी समीर नागटिळे म्हणाले, या स्पर्धेसाठी दिल्ली, बेळगाव , नाशिक,सांगली,विटा आदि ठिकाणांसह देशातील विविध राज्यातून सुमारे 500 हून अधिक स्पर्धकांनी आजअखेर विक्रमी नोंदणी केली आहे. ही स्पर्धा विविध चार गटात घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉन मध्ये शालेय मुले - मुली कॉलेज युवक- युवती, महिला- पुरुष व जेष्ठ नागरिक या सर्वांना सहभागी होता येणार आहे. म्हणजेच कोणत्याही वयातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध असणार आहे इच्छुक स्पर्धकांनी 31 जुलै 2022 अखेर नोंदणी करावयाची आहे. या पत्रकार परिषदेवेळी डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे उदय पाटील,आयर्नमॅन वैभव बेळगावकर, शांतिनिकेतनचे उपप्राचार्य श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.
 
अशी असणार मॅरेथॉन स्पर्धा ....
 सकाळी ६ वाजता मॅरेथॉन सुरू होणार असून ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची आहे. 

 -२१ किलोमीटर मॅरेथॉन

सकाळी ६ वाजता तबक उद्यान पन्हाळा येथून सूरु होणार असून ती पुढे बाजीप्रभू देशपांडे पुतळा, वाघबीळ, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकर बंगला, पावनगड, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज, जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान. अशी असणार आहे. 
 - ११ किलोमीटर मॅरेथॉन

ही मॅरेथॉन तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, नरवीर शिवा काशीद पुतळा, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, लता मंगेशकर बंगला, पावनगड, बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज, जाधव बंगला, सज्जाकोटी परत तबक उद्यान, अशी असणार आहे. 

 -५ किलोमीटर मॅरेथॉन

तबक उद्यान येथून सुरू होऊन ती बाजीप्रभू देशपांडे पुतळा, नरवीर शिवा काशीद पुतळा, पुन्हा बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पुसाटी बुरुज, जाधव बंगला,सज्जाकोटी परत तबक उद्यान, अशी असणार आहे.

- मॅरेथॉनचे वयोगट असे आहेत
या हाफ मॅरेथॉन मध्ये ५ किलोमीटर वयोगट : १३ वर्षांवरील. ११ किलोमीटरची मॅरेथॉन : १६ वर्षांवरील तर २१.१ किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांवरील वयोगटातील स्पर्धकांसाठी असणार आहे. यासाठी नोंदणी शुल्क अनुक्रमे 700, 1300 व 1450 रुपये इतके असणार आहे.

 - सर्व सहभागी स्पर्धकांना मिळणार दर्जेदार "किट"

सुमारे दोन हजार स्पर्धकांना संधी उपलब्ध करून देण्यात असून यातील सर्व सहभागी स्पर्धकांना मिळणार दर्जेदार "किट" देण्यात येणार आहे. या किटमध्ये गुडी बॅग,टी. शर्ट चा समावेश असून फीनीशर मेडल, टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी )ई - सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागींना नाश्ताही देण्यात येणार आहे.  

 - मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी हे घेत आहेत परिश्रम.... 

या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत. डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

 येथे करा नाव नोंदणी

मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी नोंदणी www.dscorg.in या वेबसाईटवर करावयाची असून अधिक महितीसाठी संपर्क : समीर नागटिळे ९९२३६१८०५४ व वैभव बेळगावकर - ८२०८१७२४०९ या मोबाईल क्रमांकाशी करायचा आहे.

This news is co provided by Janpratisadnews 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top