ईडी चौकशी सुरू असताना राऊत खिडकीत आले, कार्यकर्त्यांना हात दाखवला

0

 


महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत प्रत्येकवेळी शिवसेनेची बाजू समर्थपणे लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने रविवारी सकाळी धाड टाकली. गेल्या साडेचार तासांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांची कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईचा एकूण रागरंग पाहता संजय राऊत यांना अटकही केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे या सगळ्याचा सामना कशाप्रकारे करत आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक रविवारी सकाळी सात वाजताच सीआरपीएफच्या जवानांच्या बंदोबस्तात संजय राऊत यांच्या भांडूप परिसरातील बंगल्यावर दाखल झाले होते. तेव्हापासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे एरवी दररोज सकाळी पत्रकारपरिषद घेणारे संजय राऊत सकाळपासून कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसलेले शिवसैनिक संजय राऊत कधी दिसतात, याची वाट पाहत होते. अखेर चार तासांनंतर संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे घराच्या खिडकीपाशी आले. यावेळी संजय राऊत यांनी खाली उभे असलेल्या शिवसैनिकांच्या दिशेने हात उंचावून त्यांना अभिवादन केले. संजय राऊत यांच्या पाहताच शिवसैनिकांना नवे स्फुरण चढले आणि त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव नक्कीच दिसत होता. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागला आहे.

संजय राऊतांचा 'झुकेगा नय' बाणा कायम

ईडीची चौकशी सुरु असतानाच संजय राऊत यांनी काही ट्विटस केली होती. या ट्विटसमध्ये संजय राऊत यांनी, 'खोटी कारवाई..खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. राऊतांच्या या एकूण ट्विटसचा सूर पाहता संजय राऊत हे ईडीसमोर सहजासहजी शरण जातील, असे दिसत नाही. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असेही संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.


This news is co-provided by Janpratisadnews Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top