विराट कोहलीकडे अजूनही ३० ते ३५ शतकं ठोकण्याची क्षमता – रॉबिन उथप्पा

0

 


    भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने विराट कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या संघातील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे बरोबर नाही. त्याचबरोबर मालिकेदरम्यान ब्रेक घेण्याच्या त्याच्या निर्णयावर अक्षय घेणे योग्य नाही. रॉबिन उथप्पाच्या मते, विराट कोहलीने सलग शतकानंतर शतक ठोकले आहेत. त्यामुळे तो त्यांच्या अडचणी ओळखून लवकरात लवकर कामगिरी उंचावण्यास सक्षम असेल, असा विश्वास रॉबिन उथप्पाने व्यक्त केला. रॉबिन उथप्पाने शेअरचॅटच्या ऑडिओ चॅटरूमवर बोलताना म्हणाला की, विराट कोहलीला त्याच्या कृती किंवा खेळण्याच्या शैलीबद्दल सूचना देण्याचा अधिकार कोणालाही नाही. जेव्हा विराट कोहली धावा काढत होता आणि सलग शतके ठोकत होता, तेव्हा कोणीही असे म्हटले नाही की त्याने अशा प्रकारे खेळावे किंवा त्याने तसे खेळावे. तसंच आता त्याला धावा करता येत नसल्यानं त्याला फलंदाजी कशी करायची हे सांगण्याचा अधिकार कोणाला नाही. असेही रॉबिन उथप्पा म्हणाला. कोहलीबाबत बोलताना उथप्पा पुढे म्हणाला की, त्याने त्याच्या क्षमतेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके झळकावली आहेत. त्याने त्याची कमजोरी ओळखली तर तो क्षमतेच्या जोरावर आणखी ३०-३५ शतके ठोकू शकतो. कोहलीला एकटे राहू दिले पाहिजे म्हणजे त्याच्यावर दबाव येणार नाही. त्याला माहित आहे की त्याच्यासाठी काय चांगले आहे. एकदा कोहलीला त्याची समस्या काय आहे हे समजले की तो स्वतःच ती सोडवेल. असे रॉबिन उथप्पा म्हणाला. विराट कोहलीने ब्रेक घेतल्याबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला की, जर त्याला ब्रेक घेण्याची गरज वाटत असेल तर तो तसे करू शकतो. जर त्याला वाटत असेल की त्याला ही स्पर्धा खेळायची आहे, तर तुम्ही त्याला त्यात खेळण्याची परवानगी द्या. परंतु संघातील त्याच्या स्थानावर शंका घेऊ नका. तो एक सामना विजेता आहे आणि त्याने हे अनेक वेळा दाखवून दिले आहे की तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. सामना जिंकण्याच्या त्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचा किंवा संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही. असेही रॉबिन उथप्पा यावेळी म्हणाला.

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top