आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्यामार्फत हॉस्पीटलचा खर्च मोफत....

0

🔰 अमृतनगर ता.पन्हाळा येथील कु. सोहम सोहनलाल जैसवाल वय १० वर्ष यांच कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्यामार्फत हॉस्पीटलचा खर्च मोफत करण्यात आला. 🔰
पन्हाळा तालुक्यातील अमृतनगर येथील रहिवासी श्री. सोहनलाल जैसवाल यांनी सहा महिन्यापूर्वी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाची व्यथा मांडली होती. जगभरात एक लाख व्यक्तीच्या मागे एखाद्या व्यक्तीलाच जी.बी.एस. ह्या वॉयरसची लागण होते. कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या प्रयत्नामुळे या उपचारासाठी दवाखान्याच्या एकूण खर्च २ लाख २५ हजार रु. माफ करण्यात आला.
आज जैसवाल कुंटुबियांनी वारणानगर येथे जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. कु. सोहम सोहनलाल जैसवाल याला उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top