उद्धव ठाकरेंचा पुतण्या निहार ठाकरे एकनाथ शिंदेंच्या गटात सामील...

0


निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी किरण पावसकर हेदेखील उपस्थित होते. निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखीनच हवा मिळू शकते. निहार ठाकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. कारण ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार, हे पाहावे लागेल. निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी किरण पावसकर हेदेखील उपस्थित होते. निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आणखीनच हवा मिळू शकते. निहार ठाकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. काही महिन्यांपूर्वीच निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांना विवाह झाला होता. त्यानंतर आता निहार ठाकरे हे राजकारणात आपले नशीब आजमवणार आहेत. निहार ठाकरे हे आतापर्यंत राजकारणात कधीच सक्रिय नव्हते. मात्र, निहार यांनी ठाकरे घराण्याभोवती असलेले वलय वापरून राजकारणात स्वत:ची छाप उमटवल्यास ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान ठरू शकते. नुकतीच स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यादेखील एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top