"रिक्षा" ऐवजी आता "कार"ला दे धक्का...!

0
"दे धक्का २" मराठी चित्रपट होणार ५ ऑगस्टला प्रदर्शित

चित्रपटाचे कथानक 14 वर्षानंतर घडले लंडनमध्ये.




कोल्हापूर : नंदकुमार तेली

सुपरहिट 'दे धक्का ' हा मराठी चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या वर्षातील तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरल्याने बॉक्स ऑफिसवरही हिट झाला होता. या प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या जोरावर "दे धक्का २" या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अबालवृद्धांसह कुटुंबासमवेत पाहण्यायोग्य मनोरंजनात्मक कथानक असलेला "दे धक्का 2" हा मराठी चित्रपट 5 ऑगस्ट 2022 ला प्रेक्षकांसाठी चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

 - सिक्वेल "दे धक्का २" प्रदर्शित
होणार ५ ऑगस्टला.

चित्रपटाचे कथानक 14 वर्षानंतर लंडनमध्ये घडले असून "दे धक्का २" मध्ये ऑटो-रिक्षाची जागा आता कार ने घेतली आहे. 
चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात असाच एक चित्रपट ‘दे धक्का’. हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवास, मनोरंजन, विनोद, कुटुंबातील सदस्यांच्या व्यक्तीरेखा साकारणारा होता. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल "दे धक्का २ " ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. 

- हे आहेत प्रमुख भूमिकेत

 मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी , संजय खापरे तसेच सह कलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत .  

- टिझरला मिळाले २ मिलियनहुन अधिक व्युज

"दे धक्का २ " हा चित्रपट अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रैलर सोशल मीडिया वर रिलीज झाला आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, अल्पावधीत टिझरला २ मिलियनहुन अधिक व्युज मिळाले आहेत.
 
- चित्रपटाचे कथानक घडते
लंडनमध्ये : जेष्ठ अभिनेता महेश मांजरेकर.

 आता "दे धक्का २" मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे आणि चित्रपटाचे कथानक लंडनमध्ये घडते. "दे धक्का 2" चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे. संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत. तसेच चित्रपटाचे एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे. तसेच
"दे धक्का २" मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहेत. सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' ने प्रदर्शित केले आहेत. 
"दे धक्का २" ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सहनिर्मिती केली आहे. तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत., अशी माहिती दिग्दर्शक व मराठी चित्रपट जेष्ठ अभिनेता महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा मराठी चित्रपट मनोरंजनात्मक, विनोदी असून कुटुंबासह पाहण्यायोग्य आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. तरी जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी चित्रपटातील कलाकार, पडद्यामागच्या कलाकारांसह "दे धक्का 2" ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

- सुपरहिट 'दे धक्का ' हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित. 

सुपरहिट 'दे धक्का ' हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top