आमच्या सरकारमध्ये पाच नाही, सातजण होते; अजित पवारांनी घेतला फडणवीसांच्या टीकेचा समाचार

0

जवळपास १ महिना होत आलं राज्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकार टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे वारंवार सरकारला मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही याबाबत प्रश्न विचारत आहे. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या या टीकेचा अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. अजित पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.

यावेळी ते बोलताना म्हणाले कि, आमच्या सरकारमध्ये पाच नाही तर सात मंत्री होते. तसेच हे सर्व मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या ताकदीचे होते, असं सांगतानाच अजित पवार यांनी ठाकरे सरकारमधील सुरुवातीच्या सात मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. ठाकरे सरकार आलं तेव्हा राज्यावर संकट नव्हतं. आज पूरपरिस्थिती शेतकरी व्याकूळ आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. आम्ही जर काही सांगितलं तर तुम्ही नव्हता का सातजणं? तुम्ही नव्हता का पाचजणं? हे काही उत्तर नाही. पंचनामे कसे होतील, त्यांना मदत कशी मिळेल हे उत्तर पाहिजे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे देणं हे उत्तर असलं पाहिजे, असा टोला पवार यांनी लगावला.

तर फडणवीसांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले कि आमच्या सरकारमध्ये पाच मंत्री असल्याचं सांगितलं. त्यांचा आकडा चुकीचा आहे. सात लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती. त्या सातजणांमध्ये एकनाथ शिंदेही होते. भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top