एकनाथ शिंदेंनी भाजपवर आरोप करत राजीनामा दिला होता, माझ्याकडे क्लिप आहे – उद्धव ठाकरे

0


शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असेही ते म्हणाले. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित कारण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक जुनी आठवण करून देत त्यांच्यावर टीकास्त्र सोडल. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका जुन्या क्लिपबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या क्लिपचाही हिशोब काढला आहे.याच मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल? त्यावर ते म्हणाले की, का नाही होणार. तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. शिवसेनाप्रमुखांचं वचन आजही कायम आहे. मी पण शिवसैनिकचं आहे पण मी मुख्यमंत्री होणार असं कधीही म्हणालो नव्हतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची वचनपूर्ती झाली. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे. ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर मी कशाला पक्षप्रमुख हवा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This news is co-provided by Janpratisadnews 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top