संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल, झाडाझडतीला सुरुवात

0
ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते अशी ओळख असणाऱ्या संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. काहीवेळापूर्वीच संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले आहे. त्यानंतर ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

This news is co provided by Janpratisadnews 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top