नोकरी बदलल्यानंतर PF चे पैसे काढायचे आहेत? आधी वाचा EPFO चे नियम, नाहीतर होईल नुकसान

0

खासगी क्षेत्रात काम करणारे लोक अनेकदा नोकरी बदलत राहतात. यावेळीही प्रत्येक क्षेत्रात सध्या भरती सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक नवीन कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. तुम्ही देखील असे करत असाल, तर तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (ईपीएफ) बेफिकीर राहू नका, अन्यथा तुम्हाला दुहेरी तोटा सहन करावा लागू शकतो.
नोकरी सोडल्यानंतर जर तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये कोणताही व्यवहार केला नाही, तर ते काही काळासाठीच सक्रिय राहते. त्याच वेळी, व्यवहाराशिवाय खात्यावर विनिर्दिष्ट कालावधीनंतर ठेवीवर मिळालेले व्याज करपात्र उत्पन्नात रूपांतरित केले जाते.

निष्क्रिय EPF खात्यावर कधीपर्यंत मिळेल व्याज?
नोकरी सोडणाऱ्यांपैकी बहुतेकांना असे वाटते की त्यांच्या पीएफ खात्यात जमा रकमेवर व्याज मिळत राहील आणि त्यांचे भांडवल वाढत राहील. मात्र, हे काही ठराविक कालावधीसाठीच ओटे. नोकरी सोडल्याच्या जर पहिल्या ३६ महिन्यांत कोणतीही योगदान रक्कम जमा केली नाही, तर ईपीएफ खाते इन-ऑपरेटिव्ह खात्याच्या श्रेणीमध्ये जाते. अशा परिस्थितीत, तुमचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही तीन वर्षापूर्वी काही रक्कम काढली पाहिजे.
पीएफ खाते निष्क्रिय होण्याचा कालावधी
सध्याच्या नियमांनुसार जर कर्मचारी ५५ व्या वर्षी निवृत्त झाला आणि ३६ महिन्यांच्या आत जमा रक्कम काढण्यासाठी अर्ज केला नाही, तर पीएफ खाते निष्क्रिय होईल. सोप्या शब्दात सांगायचे तर कंपनी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर व्याज जमा होत राहील आणि वयाच्या ५५ वर्षापर्यंत ते निष्क्रिय होणार नाही.

पीएफ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स आकारला जाईल?
नियमांनुसार योगदानाची रक्कम जमा न केल्यास पीएफ खाते निष्क्रिय होत नाही. मात्र या कालावधीत मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर कर आकारला जातो. ७ वर्षे निष्क्रिय राहून पीएफ खात्यावर दावा केला गेला नाही, तर ही रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी (एससीडब्लूएफ) मध्ये जाते. ईपीएफ आणि एमपी कायदा १९५२ च्या कलम १७ द्वारे सूट दिलेले ट्रस्ट देखील ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीच्या नियमांच्या कक्षेत येतात. आणि त्यांना देखील खात्यातील रक्कम कल्याण निधीमध्ये हस्तांतरित (ट्रान्सफर) करावी लागेल.

कल्याण निधीमध्ये हस्तांतरण रकमेचा दावा करू शकतो?
पीएफ खात्यात हस्तांतरित केलेली दावा न केलेली रक्कम २५वर्षे ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये राहते. या दरम्यान पीएफ खातेदार रकमेवर दावा करू शकतात.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top