वर्षा राऊत यांची 10 तास ईडी चौकशी; सर्व प्रश्नांची उत्तरे दिली

0

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली आहे. ईडी शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी करू शकते. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे ईडी राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांच्या खात्यावर आलेल्या एक कोटी 8 लाखांच्या संदर्भात ईडी वर्षा राऊत यांना प्रश्न विचारू शकते, अशी शक्यता होती.

यानंतर काल वर्षा राऊत यांची ‘ईडी’ने कथित पत्राचाळप्रकरणी तब्बल दहा तास चौकशी केली. चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना वर्षा राऊत यांनी, मी ‘ईडी’ला चौकशीत पूर्ण सहकार्य केले असून त्यांनी पुन्हा बोलावले तर तेव्हाही येईन, असे सांगितले. वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने समन्स पाठवून काल चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार त्या सकाळी साडेदहाच्या सुमारास बॅलार्ड पिअर येथील ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या. रात्री नऊच्या दरम्यान त्यांची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर ‘ईडी’ कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिली आहेत. पुन्हा चौकशीला येण्याबाबत मला सांगण्यात आलेले नाही. मात्र बोलावले तर नक्की येईन, असे वर्षा राऊत म्हणाल्या. आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहू, असे वर्षा राऊत म्हणाल्या. चौकशीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top