4G SIM वर मिळेल 5G सर्विस?, की नवीन सिम घ्यावे लागेल, आधीच्या सिमकार्डवरून हे समजून घ्या

0

 भारतात ५जी स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया संपली आहे. आता देश ५जी सर्विससाठी तयार आहे. १५ ऑगस्टला या सर्विससंबंधी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. यानंतर ऑक्टोबर पर्यंत ५जी सर्विस देशात येवू शकते. परंतु, यूजर्संना यासंबंधी अनेक प्रश्न पडले आहेत. ४जी सिमवर ५जी सर्विस दिली जाईल का, की यासाठी नवीन सिम कार्ड घ्यावे लागेल. या संबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या.



२जी नंतर ३जीसाठी जारी केले नवीन सिम

४जी सिम वर ५जी सर्विस मिळणार आहे की, नाही यासाठी थोडी माहिती जाणून घ्यावी लागेल. भारतात मोबाइल सर्विस २ जी सोबत सुरू झाली होती. परंतु, २००८ मध्ये MTNL ने 3G सोबत भारतात एन्ट्री केली. यानंतर BSNL ची 3G सर्विस आली. २०११ मध्ये स्पेक्ट्रम लिलावानंतर खासगी ऑपरेटरने आपली ३जी सर्विस सुरू केली होती. ज्यात Airtel, Vodafone आणि IDEA सह अनेक कंपन्या होत्या. परंतु, त्यावेळी सर्विस सुरू केल्यानंतर ऑपरेटरने यूजर्संना 3G सेवेसाठी नवीन सिम घ्यायला सांगितले होते. जुन्या सिमवर ही सर्विस दिली नव्हती.

३जी नंतर ४जी सर्विस आली
३जी नंतर ४जी सर्विस आली. Airtel, Vodafone आणि Idea सारख्या कंपन्यांनी आपली सेवा सुरू केली त्यावेळी सुद्धा नवीन सिम घेण्यास सांगितले होते. जुन्या सिमवर ही सर्विस दिली नव्हती. यात जिओच उल्लेख करणार नाही. कारण, जिओची सर्विस ४जी सोबत सुरू करण्यात आली होती. तसेच यासाठी नवीन सिम घेणे गरजेचे होते. त्यामुळे ५जी सर्विससाठी आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, ही सर्विस ४जी सिमवर सुरू होईल की नाही. ४ जी सिमवर आरामात ५जी सर्विस दिली जावू शकते. परंतु, हे ऑपरेटर्सवर अवलंबून आहे. परंतु, अजून ऑपरेटर्सने यूजर्संना अंधारात ठेवले आहे. यासंबंधी अद्याप स्पष्ट अशी काहीच माहिती दिली नाही. Apple iPhone आणि Samsung सह अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये e-SIM सर्विस दिली आहे. तसेच चांगले काम करीत आहे. विना सिम शिवाय, ते फोन 2G, 3G, 4G आणि 5G प्रत्येक नेटवर्कला सपोर्ट करीत आहे. जर एका यूजरकडून २५ रुपये एका सिम कार्डसाठी घेतले तर ३० कोटी किंवा ४० कोटी यूजर्सकडून हे पैसे घेतल्यानंतर कंपन्यांना किती फायदा होवू शकतो.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top