किडनी स्टोन किंवा मुतखडा अगदी मेणासारखा गळून पडेल, करा फक्त हे 5 घरगुती उपाय.!

0

किडनी हा मनुष्याच्या शरीरामधील सर्वात महत्त्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. किडनचे मुख्य काम आहे शरीरातून हानिकारक आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणे आणि पाणी, अन्य द्रव्य पदार्थ, रासायनिक आणि खनिजांचा स्तर कायम राखणे होय. किडनी ही शरीरातील संपूर्ण रक्त फिल्टर करण्याचे काम देखील करते. आरोग्यदायी आयुष्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडे योग्य रितीने काम करणारी किडनी असायला हवी. मनुष्य रोज विविध खाद्य पदार्थाचे सेवन करतो जे पुढे जाऊन उर्जेत रुपांतरीत होतात. या प्रक्रियेवेळी अनेक प्रकारचे विषारी पदार्थ हे शरीरात जमा होत राहतात. असे विषारी आणि हानिकारक पदार्थ शरीरात जमा होत राहणे हे मनुष्यसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच किडनीची शक्य तितकी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमची किडनी जेवढी निरोगी असेल तेवढे तुम्ही सुद्धा निरोगी रहाल. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने किडनी स्टोन (kidney stones) अर्थात मुतखडा निर्माण होतो. मूतखडा हा वाटाण्याच्या आकाराचा असू शकतो किंवा गोल्फच्या बॉल इतका मोठा असू शकतो. मुतखडा सामान्यत: कॅल्शियम ऑक्सालेट किंवा अन्य योगीकांपासून तयार होतो आणि याची बनावट ही क्रिस्टल्ससारखी असते. जर शरीरात मुतखडा निर्माण झाला तर वजन कमी होणे, ताप येणे, उलटी होणे, रक्तमेह आणि पोटाच्या खालील बाजूस भयंकर वेदना होणे शिवाय लघवी करताना खूप प्रॉब्लेम होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मुतखडा हा सामान्यत: सर्जरी करूनच काढला जातो. पण काही असे प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहेत जे किडनी स्टोन काढण्यास मदत करू शकतात.

जल हेच अमृत मानले गेले आहे. पाणी हे हाइड्रेशनचा स्तर संतुलित राखण्यास मदत करते. पाणी हे पचन आणि अवशोषण क्रिया अधिक जलद गतीने होण्यास मदत करते. पाणी शरीरातून अनावश्यक विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. जर हे पदार्थ असेच आत राहिले तर त्यामुळे किडनीला अधिक जास्त नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना मूतखडा झाला आहे त्यांचा मूतखडा मुत्र विसर्जनामधूनच बाहेर निघावा यासाठी त्यांना दिवसातून 7-8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल हे मिश्रण मूतखड्यावर प्रभावी ठरू शकते. हे कॉम्बिनेशन ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. ज्या लोकांना आपला मुतखडा हा मुत्रावाटे सहज बाहेर पडावा असे वाटते त्यांनी हे मिश्रण तोवर रोज प्यावे जोवर मुतखडा बाहेर पडत नाही. लिंबाचा रस हा मुतखडा तोडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑईल कोणत्याही वेदना किंवा त्रासाशिवाय तो खडा सहजपणे शरीरातून बाहेर पडावा म्हणून लुब्रिकेंटसारखे म्हणजेच चिकटपणा वाढवण्याचे काम करते.

अ‍ॅप्पल व्हिनेगरमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते जे किडनी स्टोनला हळूहळू छोटया छोट्या कणांमध्ये तोडण्यात आणि पाण्यातच मिक्स होण्यास मदत करते. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हे मुत्रमार्गाच्या माध्यमातून मूतखडा हटवण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि किडनी साफ करण्यासाठी अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर करतात. दोन मोठे चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर रोज गरम पाण्यासोबत तोपर्यंत प्या जोवर मुतखडा पूर्णपणे बाहेर पडत नाही.

डाळिंब हे पोषक तत्वांनी भरपूर भरलेले असते. डाळींबाचा रस हा सर्वात चांगल्या अशा नैसर्गिक पेयांपैकी एक आहे जे शरीराला हायड्रेटेड राखण्यास मदत करतात. मूतखडा दूर करण्यास डाळींबाचा रस खुप प्रभावी ठरू शकतो हे अनेक जाणकारांनी सांगितलेले आहे. यात चांगले अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.

मक्याचे केस किंवा मक्याच्या कणसावर असलेले रेशमी धागे, मक्याच्या भुसामध्ये आढळतात आणि ते सहसा फेकून दिले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की हे किडनी स्टोन शरीरातून काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. मक्याचे केस पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिऊ शकतो. हे नवीन मुतखडे किंवा किडनी स्टोन्स तयार होण्यास सुद्धा अडथळा निर्माण करतात आणि हा उपाय लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा औषधी ठरतो. ज्यामुळे लघवीचा प्रवाह वाढतो. हे कणसावरील केस किडनी स्टोनशी संबंधित वेदना कमी करण्यास सुद्धा मदत करतात.

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top