सांगली विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेणेत आमदार सुधीर गाडगीळ यांना यश

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)

सध्या चालू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सांगली विधानसभा मतदार संघासाठी विविध रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर होण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी शासन दरबारी पाठपुरावा चालू केला होता अखेर त्याला चालू पावसाळी अधिवेशनामध्ये पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला .या रस्त्यांचा विकास कामाचा निधी मंजूर होण्यासाठी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे बहुमोल सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सादर केले. सदर मंजूर झालेल्या निधी अंतर्गत हरिपूर ते अंकली रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे- ५ कोटी ,  खोतवाडी ते नांद्रे रस्ता सुधारणा करणे - ६ कोटी , माधवनगर जकात नाका ते म्हसोबा जंक्शन र्स्डता रुंदीकरणासह सुधारणा करणे - ६ कोटी , समडोळी ते सांगलीवाडी रस्ता सुधारणा करणे- ५ कोटी, सांगली आकाशवाणी ते शामराव नगर ते हनुमान नगर ते हसरा चौक रस्ता सुधारणा करणे. १.५ कोटी, मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्त्याची  सुधारणा करणे -४ कोटी, कदमवाडी ते सांगली वाडी  रस्त्याची रुंदीरकणासह सुधारणा करणे -३.५  कोटी शिरगाव फाटा ते खोतवाडी व बिसूर ते बुधगाव रस्ता सुधारणा करणे- ६ कोटी , कर्नाळ रोड  वरील म्हसोबा मंदिर ते मौजे डिग्रज ते ब्रम्हनाळ कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे, - ७ कोटी, कर्नाळ ते म्हसोबा मंदिर रस्ता सुधारणा करणे - ६  कोटी व कुपवाड रोड अहिल्या नगर ते सांगली मिरज रोड वरील  हनुमान मंदिर पर्यंत रस्ता सुधारणा करणे .अश्या रस्त्यांच्या कामाचा समावेश अाहे. तसेच पुढील काळात  नाबार्ड अंतर्गत शास्त्री चौक हरिपूर रोड वरील लहान पूलाचे बांधकाम करणे ४ कोटी व नावरसवाडी फाटा जवळील लहान पुलाचे  बांधकाम करणे १२ कोटी अशी एकूण १६ कोटीची कामे मंजूर होतील अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली...

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top