कोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली - राधानगरी धरणातून 3028 क्युसेक विसर्ग

0



कोल्हापूर : नंदकुमार तेली 

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 236.13 दलघमी पाणीसाठा आहे. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरण बुधवारी पहाटे 5 वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 खुला करण्यात आला आहे. सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अशी माहिती कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयतर्फे देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील नद्यांवरील 75 बंधारे पाण्याखाली 


पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी, कडवी नदीवरील- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, बिजूरभोगोली, पिळणी व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी व सुळंबी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे, धामणी नदीवरील- सुळे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी असे 75 बंधारे पाण्याखाली आहेत.


 धरणांमध्ये पाणीसाठा


आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 236.13 दलघमी, तुळशी 88.19 दलघमी, वारणा 879.31 दलघमी, दूधगंगा 599.89 दलघमी, कासारी 65.46 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.25 दलघमी, पाटगाव 93.49 दलघमी, चिकोत्रा 39.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.


           अशी आहे बंधाऱ्यांची पाणी पातळी


राजाराम 40 फूट, सुर्वे 37.9 फूट, रुई 66.9 फूट, इचलकरंजी 62 फूट, तेरवाड 54.6 फूट, शिरोळ 49.6 फूट, नृसिंहवाडी 47.3 फूट, राजापूर 37.7 फूट तर नजीकच्या सांगली  23 फूट व अंकली 27.5 फूट अशी आहे.


 राजाराम बंधारा पाणी पातळी

 ४० फूट ०४" इंच

 

   दुपारी १२:०० वाजता

राजाराम बंधारा पाणी पातळी

 ४० फूट ०४" इंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व धोका पातळी - ४३ फूट आहे.) एकुण 75 बंधारे पाण्याखालील गेले आहेत.


This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top