भारतानं पाकिस्तानला लोळवलं, स्मृती मानधनानं धोनी स्टाईलनं षटकार लगावत मॅच संपवली

0

 


    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्या महिला संघाचा क्रिकेट सामना पार पडला. भारतीय संघानं या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे. स्मृती मानधनाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या महिला संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळं भारतापुढे १०० धावांचं आव्हान होतं. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडियाच्या महिला संघानं जिंकला आहे. सलामीवीर स्मृती मानधनानं धोनी स्टाईलमध्ये षटकार खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या संघानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय पाकिस्तानसाठी चुकीचा ठरला आहे. सामन्यापूर्वी पावसानं हजेरी लावल्यानं मॅचमधील ओव्हर्सची संख्या १८ करण्यात आली होती. भारतीय महिला बोलर्सच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला केवळ ९९ धावा करता आल्या. भारतीय टीमनं ही मॅच १२ व्या ओव्हरमध्ये जिंकली. भारतानं या मॅचमध्ये केवळ २ विकेट गमावल्या.

भारताच्या टीमनं आक्रमक सुरुवात केली होती. स्मती मानधना आणि शेफाली वर्मानं जोरदार सुरुवात केली होती. मात्र, शेफाली वर्मा ९ बॉलमध्ये १६ धावा करुन बाद झाली. तिनं एक शानदार षटकार देखील लगावला. शेफाली आणि स्मृती मानधना यांच्यात ६४ धावांची भागिदारी देखील झाली.

Twitter - BCCI Women

स्मृती मानधनाची वादळी खेळी
स्मृती मानधनानं ४२ बॉलमध्ये ६३ धावा करत टीम इंडियाला सामना एकहाती जिंकवून दिला. स्मृतीनं तिच्या खेळीमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. स्मृती मानधनाच्या कामगिरीच्या जोरावर आजचा सामना टीम इंडियाला जिंकवून दिला. आजच्या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत त्यांच्या गटात पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे पाकिस्तान गटात सर्वात तळाला आहे. पाकिस्तानला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

पाकिस्तानचा डाव ९९ धावामध्ये आटोपला
पाकिस्तानच्या टीमनं पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ९९ धावा केल्या. पाकिस्तानकडून मुनीबा अली हिनं ३२ धावा केल्या. पाकिस्तानच्या सहा खेळाडूंना १० धावा देखील करता आल्या नाहीत. भारताकडून स्नेहा राणा, राधा यादव यांनी दोन-दोन विकेट घेतल्या आहेत. रेणुका, मेघना आणि शेफाली यांनी एक विकेट घेतली. पाकिस्तानची सहावी विकेट ९६ धावा असताना पडली होती. त्यानंतर पुढील तीन धावांमध्ये त्यांच्या तीन विकेट पडल्या आणि त्यांचा संघ ९९ धावांवर सर्वबाद झाला.

This news is co-provided by Janpraisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top