सांगलीत श्री गणरायाच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात..

0




जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)

कोरोना नंतर प्रथमच सांगलीत होणाऱ्या यंदाच्या श्री गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या श्री गणरायाच्या मूर्तीचे काम कारागिरांकडून अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यासंबंधी सांगलीतील प्रसिद्ध मूर्तिकार नंदकुमार सूर्यवंशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली असता त्यांनी सर्व माहिती विशद करून सांगितली. सन १९९९ साली श्री गणरायाच्या आशिर्वादाने त्यांनी मूर्ती तयार करण्याचे स्वप्न साकार केले. सुरुवातीस त्यांना अनेक अडचणींना व परिस्थितीला सामोरे जावयास लागले. सध्या पर्यावरण पूरक शाडूच्या मूर्तीची मागणी फारच वाढली आहे. त्या मानाने प्लास्टरच्या मूर्तीची मागणी आता कमी झाली आहे. सध्या मूर्ती तयार करण्याच्या लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात भरमसाठ वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम श्री गणरायाच्या मूर्तीच्या दरातही झाला आहे. प्लास्टर ,शाडू ,रंग ,ब्रश, मातीचे रंग ,इलेक्ट्रिक बील यात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. यावर्षी श्री गणरायाच्या मोठ्या मूर्तींची मागणी बाजारात गणेशोत्सव मंडळाकडून जास्त प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले शिवाय पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही भरपूर वाढ झाल्याने मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत प्रचंड वाढ दर्शवत आहे. यावर्षीचे आमचे शंभर टक्के बुकिंग पूर्ण झाले असून सध्याच्या बाजारातील ग्राहकांच्या मागणी इतका पुरवठा आमचे कडून होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. माझ्याबरोबर माझ्या घरच्या मंडळी यात प्रामुख्याने माझी पत्नी कविता सूर्यवंशी हिची साथ मोलाची लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर दहा ते पंधरा कारागिर माझ्याकडे कामास आहेत. सांगलीस यंदा गणेश भक्तांचा उत्साह अफाट व उत्साहवर्धजनक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top