सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकाना मालमत्ता करासोबत पाणी पट्टी बील आकारणेवरून समस्त सांगली कर नागरीकां मध्ये तीव्र नाराजी

0


जनप्रतिसाद न्युज नेटवर्क :-

( अनिल जोशी )

गेल्या 30 मार्च रोजी झालेल्या सभेच्या ठरावानुसार सां. मि. व कु. महापालिका क्षेत्रातील सरसकट सर्व मालमत्ता धारकांना मालमत्ता करासोबत सहा महिन्याची पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. यामध्ये व्यापारी दुकान गाळ्यासह सर्व मालमत्ता धारकांचा समावेश आहे. याबाबतीत एक सर्व समावेशक तज्ञांची समिती नेमुन त्यांच्या मार्फत या पाणीपट्टी बाबत काय पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतात याचा महानगरपालिका प्रशासनाने विचार करणे महत्वाचे आहे , सार्वजनिक नळ कनेक्शनचे वापर व्यवस्थित होत आहे कि नाही?, पाणी गळती कुठे होती काय? बरेच ठिकाणी बसवलेले मिटर हे जुने नादुरुस्त आहेत का ? किती मिटर बंद अवस्थेत आहेत ? यांचा विचार करणे योग्य होणार आहे. दरमहा १६० रु.प्रमाणे वार्षिक १९२० रु. पाणी पट्टी हि मालमत्ता करासोबत सरसकट सर्व दुकान गाळ्यासह सर्वच मालमत्ता धारकाना आकारणे हे कितपत योग्य आहे.? याबरोबरच प्रथमता: दर्जेदार मिटर बसवणे, देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणा उभी करणे यावर सुद्धा प्राधान्याने विचार करणे ही महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका क्षेत्रासाठी दररोज किती लिटर पाणी पुरवठा केला जातो? व प्रत्यक्षात किती लिटर पाण्याचे उत्पन्न महापालीकेस प्राप्त होते? याचा विचार करून पाणी गळतीच्या कारणांचा शोध करणे हे महत्त्वाचे आहे. याबाबतीत संबंधीत क्षेत्रातील तज्ञांची समिती नेमुन महापालिका प्रशासनाने व्यवस्थित धोरण ठरवून मग त्याची अंमलबजावणी करणे हे योग्य होणार आहे. आगामी आठवड्यात होणाऱ्या विशेष महासभेत सर्वंकष धोरण ठरून याबाबतीत मार्ग निघेल अशी समस्त सांगलीकरांची अपेक्षा आहे.

This news is co-provided by Janpratisadnews
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top