शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं कार अपघातात अकाली मृत्यू...

0


राज्याच्या राजकारणात आज एक दुःखद घटना घडली आहे. आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला.अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते, उपचारदरम्यान विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top