फोनमधून सहज लॅपटॉपवर ट्रान्सफर करता येईल फोटो-व्हिडिओ, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

0
सध्या स्मार्टफोन हे ६४ जीबी, १२८ जीबी स्टोरेजसह येतात. फोनमध्येच जास्त स्टोरेज उपलब्ध असल्याने व्हिडिओ, फोटो व इतर फाइल्स सेव्ह करणे सहज शक्य होते. परंतु, एवढे स्टोरेज देखील अनेकदा कमी पडते. अशावेळी लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर डेटा ट्रान्सर करावा लागतो. अनेककांना फोनमधून लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर डेटा कसा ट्रान्सफर करायचा हे माहित नसते. मात्र, आम्ही तुम्हाला सोपी प्रोसेस सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज फोनमधील डेटा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

यूएसबी ट्रान्सफर
यूएसबीच्या मदतीने तुम्ही डेटा सहज ट्रान्सफर करू शकता. डेटा केबलच्या मदतीने सहज डेटा ट्रान्सफर करणे शक्य आहे. डेटा केबलसाठी तुम्ही मोबाइल चार्जरसोबत येणाऱ्या केबलचा देखील वापर करू शकता. यासाठी तुम्हाला यूएसबी केबल फोन आणि लॅपटॉपला कनेक्ट करावी लागेल. त्यानंतर फोनमध्ये नॉटिफिकेशन येईल, त्यावर क्लिक करा. आता तुम्ही फोनमधील फाइल सहज लॅपटॉपमध्ये स्टोर करू शकता.

ओटीजी ट्रान्सफर
ओटीजीच्या मदतीने डेटा ट्रान्सफर करणे देखील सोपे आहे. यासाठी ओटीजी अ‍ॅडॉप्टरची गरज आहे. ओटीजी अ‍ॅडॉप्टरच्या मदतीने पेन ड्राइव्हला अटॅच करायचे आहे. त्यानंतर मोबाइल सेटिंगवरून ओटीजी ऑप्शन इनेबल करा. तुम्ही डेटा पेन ड्राइव्हमध्ये ट्रान्सफर करू शकता. पुढे पेन ड्राइव्हला लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरशी कनेक्ट करून डेटा सुरक्षित करू शकता.

ऑनलाइन क्लाउड ड्राइव्ह अपलोड
डेटा ऑनलाइन क्लाउड ड्राइव्हमध्ये स्टोर करणे एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुम्ही कोठेही व कधीही डेटा अ‍ॅक्सेस करू शकता. काही मोबाइल कंपन्या देखील यूजर्सला ऑनलाइन डेटा सिंक करण्याचा पर्याय देतात. तुम्ही गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोचा देखील वापर करू शकता. यासाठी गुगल ड्राइव्हवर जी-मेलने साइन अप करावे लागेल. तुम्ही एका क्लिकवर डेटा ट्रान्सफर आणि अ‍ॅक्सेस करू शकता.

This news is co-provided by Janpratisadnews


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top