कोल्हापूरात गणरायाच्या आगमन मिरवणुका जल्लोषात...!

0


 

 कोल्हापूर : नंदकुमार तेली

  गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच मंगळवार रात्रीपासून मंडळासह घरगुती गणेशाचे कार्यकर्ते भक्तांच्या जल्लोषात आगमन सुरू झाले. गणेश चतुर्थीचा प्रमुख दिवस बुधवारी सकाळच्या सत्रात घरगुती गणेशाचे गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात तर दुपारनंतर तालीम, मंडळांच्या गणपती आगमन मिरवणुका पारंपरिक वाद्य, साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात, लाईट इफेक्टच्या झगमगाटात काढण्यात आल्या. 


घरगुती व मंडळाच्या गणेश मूर्ती आणण्यासाठी गंगावेश, पापाची तिकटी, रंकाळावेश, शाहूपुरी, बापट कँप तसेच उपनगरात विविध ठिकाणी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे आगमन मार्गावर उभारण्यात आलेल्या विविध आवश्यक वस्तूंच्या (रुमाल, गणपती बाप्पा मोरया मजकूर लिहिलेल्या भगव्या पट्टी, टोपी आदी वस्तू खरेदीसाठी, फुलबाजार, मिठाई दुकान, किराणा आदी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. 


  महाद्वार रोड, राजारामपुरी जनता बाजार रोड आदी प्रमुख मार्गासह शहरातील विविध प्रमुख मार्गांवर तसेच उपनगरातील मंडळांच्या साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात, लाईट इफेक्टच्या झगमगाटात व गाण्याच्या ठेक्यावर तरुणाईने धरला ताल भर पावसातही रात्री उशीरापर्यंत सुरु राहिल्या जल्लोषात आगमन मिरवणूका.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top