शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…

0

 


महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिले होते. राजभवणात तयारी देखील सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले-

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी 100 हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत 182 सरकारी आदेश जारी केले होते.

शिंदे सरकार विरोधकांच्या निशाण्यावर-

खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार याचा उल्लेख आहे.

मंत्रिमंडळ विस्तार फॉर्म्युला-

सर्वांच्या सहमतीने मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजप मध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 35-65 असा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून 20 मंत्रीपदांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर भाजपने 15 ते 17 मंत्रीपदे देण्याचे मान्य केले. तर भाजपला 24 ते 25 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे


This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top