सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने गणपती मंदिरासमोर महाआरती करून आपल्या मागण्यांसाठी दोन दिवसांच्या नागरी साखळी उपोषणास सुरुवात

0

 

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )


दिनांक 22 पासून सांगलीच्या गणपती मंदिरासमोर महा आरती करून आपल्या मागण्यांसाठी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने दोन दिवसांचा लाक्षणिक नागरी साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे .सांगली- कोल्हापूर - सातारा या तीन जिल्ह्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या व महाप्रचंड नुकसानीस कारणीभूत ठरत असलेल्या महापुरावर मात करण्यासाठी महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने काही पर्यायी मुद्दे व उपाय शासन दरबारी अहवालाच्या स्वरूपात मांडून लक्ष वेधून घेण्यासाठी हे दोन दिवसाचे लाक्षणिक उपोषण चालू केले आहे. वारंवार येणाऱ्या महापुरामुळे पिकांचे अतोनात नुकसान ,पशु हानी , आर्थिक हानी ,नागरिकांचे हाल व भयग्रस्त वातावरण यावर कुठेतरी नियंत्रण करता आले पाहिजे या उदात्त हेतूने शासनास काही खर्चाचे व बिन खर्चाचे पर्याय सुचवण्यात आले आहेत .केंद्र सरकारने धरण नियमांच्यात काही बदल करून या सर्व गोष्टीवर अंकुश ठेवणे तसेच मुख्यमंत्री महोदयांनी सदरहू संभाव्य महापुराच्या परिस्थितीबाबत सत्वर लक्ष देऊन मार्ग काढण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे . महाराष्ट्र शासनाने अद्यापि महापूर नियंत्रण सुरक्षा समिती गठीत केली नसून शासनस्तरावर धरणाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचे कृती समितीचे मत आहे .अलमट्टी धरणाच्या बाबतीत अजूनही कर्नाटक शासनाकडून नियमाचे पालन होत नसल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने आपल्या अहवालात नमूद केलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व तत्काल योग्य ती कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी कृती समितीचे निमंत्रक , कार्यकर्ते नागरी साखळी उपोषणास बसले असून त्यास शिरोळ येथील आंदोलन अंकुश चे कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व धरणे रिकामी ठेवणे ,शामराव नगर मध्ये पाण्याची योग्य ती व्यवस्था करणे, महामार्गाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग ठेवणे, बंधाऱ्यातील बरगे वेळेवर व्यवस्थित काढणे व बसवणे, अलमट्टी धरणाच्या बाबतीत बेंच मार्क नव्याने स्थापन करणे आदी मागण्यांचा अहवालात समावेश आहे. सदरहू आंदोलनस्थळी माननीय विजय कुमार दिवाण अभियंता जल अभ्यासक, निमंत्रक सर्जेराव पाटील ,प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ ,संजय कोरे ,अंकुश जाधव, धनाजी चडमुंगे, दीपक पाटील ,अमोल गावंडे, सचिन सगरे, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, दिनकर पवार ,बाबूलाल शहा, कीर्ती कोठारी, संदीप हत्तीकर ,सुरेश हर्डीकर आदी समिती सदस्य व पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top