सांगली- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन २ ऑक्टोंबर २०२२ रोजी धनंजय गार्डन सांगली येथे संपन्न होणार

0

 


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ ऑक्टोंबर २०२२ रोजी धनंजय गार्डन सांगली येथे संपन्न होणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली. आज अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल दादा पाटील यांची भेट घेऊन अधिवेशन नियोजना संबंधी चर्चा केली . खाजगी शिक्षण संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांना जाणवणाऱ्या समस्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात संस्थाना येणाऱ्या वारंवार अडचणी संबंधी चालू अधिवेशनात काही ठराव संमत करून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही शासन दरबारी होण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींचे मार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत . सदर बैठकीचे वेळी अधिवेशन स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांचेसह कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे, विभागीय संघटक विनोद पाटोळे, संचालक प्रा. एम. एस. रजपूत व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव नितीन खाडीलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top