भारताच्या प्रियंका कवटने सुवर्णपदक पटकावत रचला इतिहास

0

 

भारताच्या प्रियंका कवटने सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेच्या १८ वर्षांखालील वयोगटातील ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. ही स्पर्धा जॉर्जिया येथील बटुमी येथे सुरु आहे. प्रियंका ही मध्य प्रदेशातील मधिला गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहे. तिचे वडील स्थानिक नर्सिंग होममध्ये काम करतात. पण खडतर परिस्थितीवर मात करत तिने हे घवघवीत यश मिळवले आहे. कारण वुशूसारख्या खेळात करीअर करणे सोपे नसते. कारण खेळाचा जास्त प्रचार आणि प्रसार भारतामध्ये झालेला नाही. त्याचबरोबर या खेळासाठी प्रशिक्षण सहज उपलब्ध होत नाही. भारतामध्ये क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळाडूंचे प्रशिक्षण सहज मिळू शकते. पण वुशू या खेळासाठी प्रशिक्षण हे फारसे लवकर उपलब्ध होत नाहीत. सुवर्णपदक पटकावल्यावर प्रियंका म्हणाली की, " ही माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि भारताचा झेंडा उंचावल्याचा मला अभिमान आहे. मला हा टप्पा गाठण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल मी माझे प्रशिक्षक, पालक आणि M3M फाउंडेशन यांची आभारी आहे. मी आता आगामी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे."


प्रियंका प्रशिक्षक मनिंद शेर अली खान यांच्याकडे प्रशिक्षण घेत होती. पण आता ती भोपाळमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) प्रशिक्षक रत्नेश ठाकूर, कल्याणी आणि सारिका यांच्याकडे गुप्ता यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. वुशू ही एक चिनी मार्शल आर्ट आहे. हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धा, आग्नेय आशियाई खेळ आणि इतर अनेक प्रमुख क्रीडा स्पर्धांचा भाग आहे. प्रियंकाने आता वयोगटातील स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. पण आता तिची खरी परिक्षा सुरु होणार आहे. कारण आता यापुढे तिला खुल्या गटात खेळावे लागेल आणि तिथे जास्त स्पर्धेचा सामना तिला करावा लागेल. त्यामुळे आता जरी तिने सुवर्णपदक पटकावले असले तरी आता पुढे तिची खरी परीक्षा सुरु होणार आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top