सांगली जिल्हयात व शहरा लागतच्या परिसरात पावसाच्या विश्रांती मुळे सध्या कृष्णेची पाण्याची पातळी स्थिरावली

0

जनप्रतिसाद न्युज नेटवर्क (अनिल जोशी) :--

गेले आठ-नऊ दिवस सांगली शहरासह कृष्णा-वारणा -पंचगंगा नदिकाठच्या गावात व कोयना-राधानगरी- चांदोली -धोम - कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अति मुसळधार पावसामुळे सांगली शहर व नदी काठच्या गावांना धोका निर्माण झाला होता. सांगली शहर व नदीकाठच्या नागरी वसाहती मध्ये गतकालीन महापुराच्या स्मृतींची चर्चा होत आहे. कोल्हापूर येथील पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्त क्षेत्र पाण्याखाली गेले आहे तसेच अनेक नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या कोयना धरणातून कृष्णेच्या नदीपात्रात १०१०० इतका क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत असून धरणाचा पाणीसाठा ९० टीएमसी झाला आहे. धरणाची क्षमता १०५ टि.एम सी. इतकी आहे. मागील २४ तासात कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे अनुक्रमे २३१ मि मि., १५५ मिमी व २५१ मिमि पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कृष्णा नदीकाठी वसलेले श्रीक्षेत्र औदुंबर (दत्त क्षेत्र) हे काल च पाण्याखाली गेले आहे. सांगली पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार कृष्णेची आयर्विन पुलानजीक पाण्याची पातळी ३५ फुटापर्यंत जाऊ शकते. सध्या आयर्विन पुलानजीक पाण्याची पातळी दुपारी २.०० वाजता २९.८ इंचावर आहे. पाण्याच्या पातळीत वाढ दिसून येत नाही.

सांगली शहराच्या आपतकालीन यंत्रणेच्या मदतीसाठी दोन एन डी आर एफची पथके यांत्रिक बोटी व अन्य सामग्री सह दाखल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना तसेच सांगली शहराच्या नदी लगतच्या भागांना सावधगिरीच्या व सतर्कतेच्या सूचना दिल्या असून शासकीय आपतकालीन यंत्रणा हाय मोडवर अलर्ट ठेवण्यात आली आहे. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.


This news is co provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top