महिला अधिकारी ०५ हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

0

 

कोल्हापूर : प्रतिनिधी


भविष्य निर्वाह निधीतील 90% रक्कम मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी भावना सुरेश चौधरी यांना कोल्हापूर लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, भावना सुरेश चौधरी या आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कसबा बावडा येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर काम करतात. तक्रारदार पुढीलवर्षी सेवानिवृत्त होणार असल्याने आपली भविष्य निर्वाह निधीतील 90% रक्कम मिळण्याकरीता उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ यांच्याकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज मंजूर करण्याकरीता भावना सुरेश चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कमेपैकी 90% रक्कम 6 लाख 72 हजार रक्कम मंजूर करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे 10 हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती 5 हजार देण्याचे ठरले. सदरची रक्कम स्विकारत असता भावना चौधरी यांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले. सदरची कारवाई राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त, सुरज गुरज अप्पर पोलीस अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने केली.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top