आज रंगणार महामुकाबला - भारत आणि पाकिस्तान...

0
आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रविवार (28 ऑगस्ट) रोजी सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. आशिया चषक 2022 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पाकिस्तानसोबतचा जुना हिशोब चुकता करायचा आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दुबईच्या याच मैदानावर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. दोन्ही स्टार गोलंदाज दुखापतीमुळे आशिया कप खेळत नाहीत. तथापि, दोन्ही संघांकडे एकापेक्षा जास्त दिग्गज टी-20 खेळाडू आहेत. चला जाणून घेऊया भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधी आणि कुठे सामना होणार आहे.

कुठे पाहणार सामना –
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच Disney+Hotstar अ‍ॅपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

भारताची संभाव्य प्लेइंग 11 –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top