सांगलीत पूर्वीच्या काळातील भव्य दिव्य श्री गणेशाच्या मूर्तीचे मंदिर म्हणजे गांवभागातील सांभारे गणपती मंदिर

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी)

सांगलीच्या श्री गणेशाच्या पंढरीत भव्यदिव्य मूर्ती असलेले प्राचीन काळातील मंदिर म्हणजे गांवभागातील सांभारे गणपती मंदिर होय . सांगली व त्याच्या आसपासच्या परिसरात बऱ्याच श्री गणेश मंदिरांची महती पसरलेली आहे . त्यात प्रामुख्याने कैलास वासी राज वैद्य आबासाहेब सांभारे यांनी सन १८९१ साली श्री सांभारे गणेश मंदिराची स्थापना केली. स्वतः कैलासवासी राज वैद्य आबासाहेब सांभारे हे सांगली संस्थान मधील प्रशासनामध्ये राजवैद्य व उत्तम नाडी परीक्षक होते .सन १८९१ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. त्यांच्या प्रेरणेतून कैलासवासी आबासाहेब सांभारे यांनी राहत्या वाड्यामध्ये श्रींचे गणेश मंदिर बांधून श्री सांभारे गणेश मंदिराची निर्मिती केली. श्री गणेशाची मूर्ती ही पांगिरा च्या लाकडापासून बनवलेली असून त्याची उंची १४ फूट ९ इंच आहे .त्या मूर्तीचे वजन अंदाजे १.५ टन असून श्री गणेशाच्या मूर्तीचे स्वरूप सुरेख भव्य दिव्य असे आहे, शिवाय महाराष्ट्रात काय पण अखंड भारतातही अशा कला अविष्काराचा नमुना शोधुन सुद्धा मिळणे दुरापास्त आहे. श्री सांभारे गणेश मंदिरातील मूर्ती ही पुरातन काळातील एक उत्कृष्ट वास्तुकलेचा वारसा लाभलेली श्री गणेशाची मूर्ती होय .पूर्वी श्रींचे गणेशोत्सवात अल्लादियाखाँ ,अब्दुल करीम खाँ, श्रीमती मोगूबाई कुर्डीकर ,कागलकर बुवा , दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर आधी गायकांनी आपल्या कलेची सेवा श्रीगणेशास अर्पित केली आहे .स्वतः लोकमान्य टिळक,गो. नी .दांडेकर ,नाथमाधव आदी नामवंत साहित्यिक व समाजसुधारक इथे नतमस्तक झाले होते .उत्सवामध्ये प्रसिद्ध मल्लांच्या कुस्त्या असायच्या .श्रींचे मंदिरामध्ये गणेशोत्सव दशमी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा होत असे व आत्तासुद्धा साजरा होत असतो. अनंत अनंत चतुर्दशीला भव्य मिरवणूक निघत असे . सनई-चौघडा ,बँड पथके ,हत्ती ,उंट ,घोडे, झुलीने सजलेल्या बैलगाड्या, शोभेचे दारूकाम होत असे. कालांतराने विजेचे व टेलिफोनचे खांब आल्याने सन १९५२ पासून भव्यदिव्य अशी श्रींची मिरवणूक खंडित झाली. सन १९९८ साली श्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे .सन १९९९ साली मूर्ती स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली .

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top