श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठा पूर्वक पूजनेचा व गौरी पूजनाचा मुहूर्त...

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी )

 बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी यावर्षी श्री गणेश चतुर्थी असून श्री गणेश पूजनासाठी मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ऑगस्ट रोजी सकाळी १०वाजून२५ मिनिटांपासून दुपारी १वाजून ५५ मिनिटापर्यंत मध्यान्ह काळ आहे .जर या वेळेस श्री गणेश पूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर केव्हाही श्री गणेशाचे पूजन केले तरी चालेल असे प्रसिद्ध पंचांग कर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ .सोमण यांनी सांगितले आहे . जेष्ठा गौरी ३सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५६ पर्यंत अनुराधा नक्षत्र असलेने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही .रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे .ज्येष्ठा गौरीचे विसर्जन चंद्रमूळ नक्षत्रात असल्याने सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत करावे .शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्या वर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने श्री गणरायाचे आगमन १९ दिवस उशिरा म्हणजे मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार असल्याचे दा. कृ .सोमण यांनी सांगितले.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top