बंडादरम्यान दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो- एकनाथ शिंदे

0


आम्ही बंड केलं तेव्हाची लढाई काही सोपी नव्हती. त्या दरम्यान आम्हाला काही दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो, असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यावेळी तेथील पद्मावती मंदिरात ग्रामस्थांनी एक सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुलदैवतेचे दर्शन घेतले आणि नंतर उपस्थित नागरिकांना संबोधित केले. तसेच यावेळी त्यांनी बंडादरम्यानचे किस्से देखील सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, “आम्ही बंड केलं तेव्हा सगळेजण खूप टेंशनमध्ये होते. माझे कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनाच चिंता होती. पण या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर होते. आमची भूमिका जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम श्रीकांत शिंदे यांनी केलं. त्याकाळात सगळ्यांनीच आम्हाला खूप वाईट उपमा दिल्या, पण मी आता त्या सगळ्यात जात नाही. पण आपल्याला माहित आहे कि, हि लढाई अतिशय कठीण होती. अजिबात सोपी नव्हती. एकीकडे सत्ता, यंत्रणा आणि मोठमोठे नेते होते, तर दुसरीकडे आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते होते.” गुवाहाटीला गेल्यानंतरचा प्रसंग सांगताना ते म्हणाले कि, “साधारणपणे लोक विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे जातात पण माझ्याबरोबर ९ लोकांनी सत्ता सोडली आणि माझ्यावर विश्वास दाखवला. सरपंच सुद्धा पद सोडताना खूप विचार करतो इथे तर ९ मंत्र्यांनी त्यांचं पद सोडलं. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. पण अश्या बाक्या प्रसंगात सगळ्यांनाच वाटत होतं आता काय होणार? परत कसं येणार? पण ती लढाई काही सोपी नव्हती. त्या दरम्यान आम्हाला थोडाही दगाफटका झाला असता तर शहीद होण्याची वेळ आली असती.”, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं. तर शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सुगीचे दिवस येतील त्यामुळे कुणी चिंता करू नका, असं देखील त्यांनी सांगितलं.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top