"दिलबहार"ने उभारलाय "नवनाथांचा ऐरावत दरबार"

0

- दिलबहार तालीम मंडळ गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांची माहिती

- दख्खनच्या राजासाठी उभारण्यात आलाय 80 फूट लांब व 42 फूट रुंद तसेच 25 फूट उंचीचा दिमाखदार सभामंडप

- दख्खनचा राजा मंगलमूर्ती आगमन मिरवणूक मंगळवारी (दि.30 ऑगस्ट) रोजी सायंकाळी पाच वाजता व्हीनस कॉर्नर चौकातून.

कोल्हापूर : नंदकुमार तेली

दिलबहार तालीम मंडळ 139 व्या वर्षात पदार्पण करत असून यंदाचा गणेशोत्सव हा लोकोत्सव करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी सभा मंडपाची रचना नवनाथ परंपरेचा आधार घेत नाथ संप्रदाय अभ्यासक संजय जाधव यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली "नवनाथांचा एकत्रित ऐरावत दरबार" ही संकल्पना साकारण्यात आली आहे. अशी माहिती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना शिंदे यांनी
दख्खनचा राजा मंगलमूर्ती आगमन मिरवणूक मंगळवारी (दि.30 ऑगस्ट) रोजी सायंकाळी पाच वाजता व्हीनस कॉर्नर चौकातून ताशा पथक लेझीम अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
 यानंतर मंडळाचे पद्माकर कापसे यांनी मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत "दख्खनचा राजा" हे कुलदैवत ज्योतिबाचे बिरूद घेऊन श्री मंगलमूर्ती महामूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले. पुढे बोलताना कापसे म्हणाले, दिलबहारच्या "दख्खनचा राजा" रूपातील गणेश मूर्तीचा नावलौकिक कोल्हापूर जिल्ह्यात असून गणेशोत्सव काळात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. गणेश मूर्तीची पाटापासून प्रभावळपर्यंत पंधरा फूट उंची आहे."दख्खनच्या राजा"साठी ८० फूट लांब व 42 फूट रुंद तसेच 25 फूट उंचीचा दिमाखदार सभामंडप उभारण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात पंचायत याग, अथर्वशीर्ष पठण, श्री मंगल आरती, तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. असेही यावेळी त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला गणेशोत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रवीण अतिग्रे, विनायक फाळके, किरण साळुंखे प्रसन्न मालेकर, संजय शिंदे, संजय रायकर, संदीप देसाई, विनय साळुंखे, प्रमोद बोंडगे, अजित पाटील, धनाजी सूर्यवंशी आदी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top