लॅपटॉप च्या माध्यमातून गुणवत्ता सिद्ध करावी. - 'इलास्टीस रन' (पुणे) या कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत पवार यांचे आवाहन.

0


व्हनाळी ता. कागल येथील जिल्हा परिषदेची शाळा विद्या मंदिर व्हनाळी येथे पुण्यातील इलास्टीस रन या कंपनीद्वारे लॅपटॉप प्रदान करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी, शिक्षक वर्ग, लॅपटॉपसह विद्यार्थी, व पालक उपस्थित.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः

माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या आविष्कारामुळे देशाची वाटचाल 5 G कडे सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत. यासाठी लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आत्मसात करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी. असे आवाहन 'इलास्टीस रन' (पुणे) कंपनीचे सहायक व्यवस्थापक प्रशांत पवार यांनी केले.

 कागल येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर व्हनाळी या शाळेत 'इलास्टीस रन' या पुण्याच्या कंपनीने C.S.R. फंडातून लॅपटॉप प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

कंपनीचे अधिकारी प्रशांत पवार, क्षितिज वाटवे, इजाज पटेल, मल्लेश कांबळे, शोहेब सौदागर, राहुल ताटे यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक बबन चौगुले यांनी स्वागत केले.

यावेळी मा.डे.सरपंच शरद पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष रविंद्र कौंदाडे, यशवंत मेथे , तानाजी सुतार, जगदीश वाडकर, अरुण पोवार आदींसह शिक्षक स्टाफ, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक बाळासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

- १२ लॅपटॉप भेट

कंपनीकडून शाळेतील मुलांसाठी एकूण १२ लॅपटॉप भेट देण्यात आले. तसेच कायमस्वरूपी मार्गदर्शन व मेंटेनन्स साठी सहकार्य करण्याची ग्वाही' यावेळी कंपनीकडून देण्यात आली.

- यांचे लाभले बहुमोल सहकार्य

शाळेला लॅपटॉप मिळवून देण्यासाठी रमेश जाधव, प्राजक्ता जाधव व राहुल ताटे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप हाताळण्यासाठी उपलब्ध झाल्याने शिक्षक व पालक वर्गातून कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. तसेच लॅपटॉप मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ही आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसत होते.


This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top