सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला ५० घरफोडीच्या गुन्हयांचा उलगडा करण्यात नेत्रदिपक यश

0

 

जनप्रतिसाद न्युज नेटवर्क :

( अनिल जोशी )


गेले कित्येक दिवस घरफोडीच्या अनेक घटना दिवसा ढवळ्या घडत असताना पोलिस यंत्रणेवर सातत्याने टिका होत असलेले दिसून आले . परंतु आज अखेर जिल्हयाला हादरुन टाकणाऱ्या व पोलिस यंत्रणेस आव्हान देत असलेल्या चार अट्टल घरफोड्यांना मुद्देमालासह अटक करण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश प्राप्त झाले आहे. त्यांचेकडून सोन्या चांदिच्या दागिन्यासह ९५००० रु. रोख असा अंदाजे १६ ( सोळा) लाखापर्यंतचा मुद्देमाल जप्त केला. गेले कित्येक दिवस गुन्हा अन्वेषण विभाग हा या अट्टल घरफोड्यांच्या मागावर होता व काल अखेर कारंदवाडी येथे छापा टाकून मोबाईल भैरू पवार वय १९, इक्बाल भैरू पवार वय ४० दोघेही राहणार करंजवडे ता. वाळवा तसेच घायल सरपंच्या काळे वय ४६ रा. चिकूडेेॅ ता. वाळवा व प्रविण राजा शिंदे वय ३१ रा. गणेशवाडी ता. वडुज यांना अटक करण्यात आली. जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कबुली दिलेल्या ५० घरफोडीचे गुन्हे घडले असल्याने संबंधीत पोलिस ठाण्याने ताबा घेवून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात हे बघणे तपास यंत्रणेला आव्हानात्मक भाग आहे. जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम यांनी पत्रकार परिषद घेवून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या या कामगिरीची माहिती दिली. जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम यांनी यापूर्वीच घरफोडीच्या गुन्हा अंतर्गत सक्त कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस विभागास दिले होते. सदर प्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार,मेघराज रूपनवर भगवान पालवे, रुतुराज होळकर प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, सुनिल लोखंडे, आर्यन देशिंगकर, दिपक गायकवाड, अरुण अौताडे, , संदिप नलवडे, नागेश खरात, सचिन धोत्रे, कुबेर खोत, विनायक सुतार, साहिल कार्तियानी, प्रशांत माळी, सुधिर गोरे, निलेश कदम, हेमंत ओमासे, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, व सुनिल जाधव आदि पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईत भाग घेतला.


This news is co-provided by Janpratisadnews



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top