पुण्यात शिंदे गट लागला कामाला, महापालिका निवडणुकीच्या तोंडांवर घेतला मोठा निर्णय

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांनी शिवसेनेत बंड करून चाळीस आमदार आणि बारा खासदारांनी भाजपला साथ दिली आणि राज्यात सत्तांतर झालं. शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरात शिवसेनेत उघड फूट पडल्याचे चित्र दिसलं. पुण्यातही शिंदे गटाला मोठ समर्थन मिळालं. तीन टर्म नगरसेवक राहिलेले प्रमोद भानगिरे यांनी सर्वात आधी पुण्यातून शिंदे गटाला समर्थन दिलं. त्यानंतर अजय भोसले, किरण साळी असे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले. आता येणारी महापालिका निवडणूक पाहता पुण्यातील शिंदे गटाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. शिंदे गटाची शिवसेना पुण्यात मजबूत व्हावी यासाठी शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, सहसंपर्कप्रमुखपदी अजय भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता विधानसभा निहाय उपशहर प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले आहे.
आगामी पुणे महापालिकेची निवडणूक पाहता आठही विधानसभा मतदारसंघात उपशहर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विकास भांबुरे - पुणे कॉन्टोन्मेंट मतदारसंघ, निलेश गिरमे - खडकवासला मतदारसंघ, सुनील जाधव - वडगावशेरी मतदारसंघ, सचिन थोरात - कोथरूड मतदारसंघ, विकी माने - हडपसर मतदारसंघ, संजय डोंगरे - शिवाजीनगर मतदारसंघ आणि सुधीर कुरूमकर यांची पर्वती मतदारसंघात उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top