"ए आबा घुमीव" गाणं युवावर्गाला थिरकायला लावणार...!

0

- मेलडी क्रिएटर्स सचिन बारटक्के, उद्योगपती प्रवीण शहा व संतोष पांचाळ यांचा विश्वास

- यंदाच्या गणेशोत्सवासाठी अस्सल कोल्हापुरी बोलीभाषेतील गाण्याची निर्मिती

कोल्हापूर : (नंदकुमार तेली)

यंदाच्या गणेशोत्सवासाठी अस्सल कोल्हापुरी बोलीभाषेतील गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपारिक वाद्यांची जोड देत अस्सल कोल्हापुरी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याच्या ठेक्यावर युवावर्गाला थिरकायला लावणार., असा विश्वास मेलडी क्रिएटर्स सचिन बारटक्के, उद्योगपती प्रवीण शहा व संतोष पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

"ए आबा घुमीव" या गाण्याचे गायक पार्थ कोठावळे व सचिन बारटक्के आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे धुमाकूळ घालणार आहेच तसेच इथून पुढे होणारे सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका, लग्न समारंभ, रोड शो, जाहीर सभा आदी कार्यक्रमांमध्ये वाजणार असून युवक-युवतींसह अबाल वृद्धांनाही या गाण्याच्या ठेक्यावर नृत्य सादर करण्याचा मोह आवरणार नाही असं गाणं आहे. या गाण्यात मराठी भाषेच्या व्याकरणाच्या चौकटीत कुठेही न बसणारे पण ज्याचा उच्चार होताच लाल मातीतल्या रांगड्या कोल्हापूरचे नाव ओठावर येते. अशा शब्दांची गुंफण करण्यात आली आहे. या गाण्याला यमक नाही गद्य, पद्य आणि रॅप याचा सुरेख संगम साधत या गाण्यासाठी रांगड्या शब्दांचा वापरावर भर देण्यात आला आहे. या शब्दांमध्ये चालतंय की... हूडीक.. ईषय हार्ड.. चकीत जाळ.. बंद पड.. कोळसा वड.. तोडलस भावा.. तिखाट जाळ .. बद्या पाऊस .. थर्ड मारतय.. पुड्या सोड आदींचा समावेश आहे. अशा इरसाल बोली भाषेतील शब्दांनी कोल्हापुरी मराठी भाषेला स्वतःचे असे एक खास स्थान मिळवून दिले आहे. एकूणच कोल्हापूरसह राज्यभरातल्या गणेशोत्सवात यंदा फक्त "ए आबा घुमीव" हे नावलौकिक मिळवेल. तसेच कोल्हापूरची रांगडी ओळख देशपातळीवर निर्माण करेल, असा विश्वास यावेळी प्रवीण शहा व संतोष पांचाळ यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top