गोकुळच्या उभारणी व प्रगतीमध्ये प्राथमिक दूध संस्थांचे मोठे योगदान

0

गोकुळच्या उभारणी व प्रगतीमध्ये प्राथमिक दूध संस्थांचे मोठे योगदान.

- गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आबा यांचे गौरवउद्गार.

- गोकुळची हिरक महोत्सवी ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.

- परस्पर विरोधी घोषणांनी महासैनिक दरबार सभागृह दणाणले.

- दूध उत्पादक सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना विरोधकांचा सभात्याग.

- विरोधी महाडीक गटाची संचालक शोमिका महाडिक यांनी घेतली समांतर सभा.

कोल्हापूर : नंदकुमार तेली.

यंदाचे वर्ष हे गोकुळचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. गोकुळच्या उभारणीत व प्रगतीमध्ये प्राथमिक दूध संस्थांचे फार मोठे योगदान आहे. असे गौरवउद्गार गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी काढले. महासैनिक दरबार येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर गोकुळ ची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.२९ ऑगस्ट २०२२) रोजी उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यंदा गोकुळचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. दुपारी एकच्या सुमारास  राजर्षी छत्रपती शाहू महाराज व गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील यांना अभिवादन करून सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील सर्व संचालक व दूध उत्पादक सभासदांचे स्वागत केले तसेच या वर्षात लाखो दूध उत्पादक, दूध संस्था व आपल्या सर्वांचे सहकार्यामुळे संघाच्या हिताचे व प्रगती निर्णय घेता आले, याबद्दल धन्यवाद मानले.
यानंतर त्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील गोकुळच्या अहवालाचे वाचन केले.  यावेळी विरोधकांनी विरोधी संचालक व दूध उत्पादकांना बसण्यास जागा दिली नाही घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला. या विरोधात सत्ताधारी समर्थकांनीही घोषणाबाजी केली या परस्परविरोधी घोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

यावेळी चेअरमन विश्वास पाटील यांनी संस्थेची उलाढाल व भाग भांडवल, उच्चांकी दुध दर, खर्चात बचत, दुग्ध शाळा, बाहेरील रूपांतरित, संकलन, बल्क मिल्क कुलर, मिल्को टेस्टर, बायोगॅस व स्लरी प्रकल्प, भविष्य कल्याण योजना, वैरण विकास, सायलेज बॅग, पशुसंवर्धन, जनावरांतील भाकड काळ कमी करण्यासाठी उपाय योजना, गर्भ तपासणी किट, गर्भ प्रत्यारोपण योजना, आयुर्वेदिक औषधोपचार, आहार संतुलन योजनेची व्याप्ती वाढवणार, पशुखाद्य, महालक्ष्मी समृद्धी लॉन्चिंग, पशुखाद्य दराबाबत, गडमुडशिंगी येथील जुन्या पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण, ओपन एक्सेस योजनेअंतर्गत सोलर सिस्टिम मार्केटिंग, वाशी शाखा दूध दर फलक, डिब्बेंचर्स, राखीव व इतर निधी कर्ज, अनुदान प्रशिक्षण, प्रशिक्षित कर्मचारी, भविष्यातील योजना, मानांकन, कामगार कल्याण मंडळ, सामाजिक बांधिलकी, वैधानिक लेखापरीक्षण नफा विभागणी आदींविषयी सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये अहवाल २०२१-२२ या सालात  संघाची उलाढाल २ हजार ९२९ कोटी इतकी असून गतवर्षापेक्षा ३७८ कोटी रूपयांने जास्त असून भाग भांडवल ५९ कोटी १७ लाख इतके झाले आहे. गोकूळ'ने  सातत्याने दूध उत्पादक सभासदानां जास्त दूध दर देण्याचा प्रयत्न केला आहे.अहवाल सालात म्हैस प्रति लिटर ४९ रूपये ९५ पैसे व गाय दूध खरेदी दर प्रति लिटर ३१ रूपये ३९ पैसे इतका दिला आहे. अहवाल सालात दूध वाहतूक टँकर भाडे कपात ""अतिरिक्त रोजंदारी कर्मचारी कपात""महानंदा दूध पॅकिंग खर्च बचत""दूध वाहतूक  टेंपो भाडे कपात या सर्व बाबीमध्ये १० कोटी रूपये बचत केली आदींचा समावेश आहे.



     दरम्यान, अहवाल वाचन व ठराव  हात उंचावून मंजूर झाल्यानंतर सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधारी संचालकांकडून देण्यात येत होती. मात्र, काही प्रश्न झाल्यावर विरोधी महाडिक गटाने सभात्याग करत संचालक शोमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाच्या बाहेर समांतर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी संचालक, दूध उत्पादक संचालकांना बसण्यास जागा दिली नाही. तसेच प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक शैलीत प्रश्नांचा भडीमार करत निशाणा साधला.

    यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतूराज पाटील" माजी आमदार के.पी. पाटील " राष्ट्रवादी यूवक  काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे""संघाचे जेष्ट संचालक अरूणकूमार डोंगळे""शशिकांत पाटील ( चूयेकर) किसन चौगले"" रणजीतसिंह पाटील""अभिजीत तायशेटे""चेतन नरके""विजयसिंह मोरे""यूवराज पाटील"अंबरिश घाटगे" बाळासो खाडे"नाविद मूश्रीफ""बयाजी शेळके"मूरलीधर जाधव"" कार्यकारी संचालक योगेश गोङबोले आदी  सर्व संचालक, भूदरगड तालूक्याचे यूवक नेते जीवनदादा पाटील""भूदरगड तालूका काँग्रेस'चे अध्यक्ष शामराव देसाई दूध उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top