मुलीशी लग्न लावून देतो म्हणून शेतकरी तरूणाला पावणे दोन लाखास लुबाडले

0

 


सांगली : लग्नाळू मुले गाठून पैशाच्या मोबदल्यात मुलीशी लग्न लावून देतो म्हणून १ लाख ७५ हजार रूपयांना खानापूर तालुक्यातील एका शेतकरी तरूणाला एका टोळींने गंडा घातला आहे. यातील नवरी मुलीला आईसह पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, खानापूर तालुययातील नेवरी येथील दत्तात्रय हसबे (वय ३१) या तरूणाचा विवाह होत नव्हता.यामुळे त्यांने लग्नासाठी मुलगी मिळवून देणार्‍यांशी संपर्क साधला. या टोळीने १ लाख ७५ हजार रूपये घेऊन मुलीशी विवाह लावून देण्याचे मान्य करून लग्नही करून दिले. मात्र, लग्न झाल्यानंतर माहेरी जाते असे सांगून मुलगी व आई सोलापूरला गेली. मुलगी नांदण्यास येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच हसबे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

या प्रकरणी प्रियांका शिंदे, दीपाली शिंदे या दोघी मायलेकींना विटा पोलीसांनी सोलापुरातून अटक केली आहे. या दोघींना आज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकार्‍यासमोर हजर केले असता ३ ऑगस्ट अखेर पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असल्याचे तपासाधिकारी उप निरीक्षक जालिंदर जाधव यांनी सांगितले. तर या टोळीतील अन्य तिघे फरार आहेत. यामध्ये जयश्री गदगे (रा. जुगूळ ता. चिकोडी), सुनील शहा (रा. निपाणी) आणि धानम्मा बिराजदार (रा.सोलापूर) हे तिघे फरार आहेत.

This news is co-provided by Janpratisadnews



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top