तब्बल ५६ देशांपेक्षा भारताच्या एकट्या शरथ कमलने जिंकली जास्त सुवर्णपदक

0

भारताच्या एका खेळाडूने तब्बल ५६ देशांपेक्षा जास्त सुवर्णपदकं जिंकली आहेत, असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण भारताचा टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने नुकत्याच संपलेल्या बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ५६ देशांपेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताच्या अचंताने या स्पर्धेत कमालच केली. अचंताने या स्पर्धेत तीन सुवर्णपदकं आपल्या नावावर केली आहेत. अचंताने पहिले सुवर्णपदक हे पुरुषांच्या सांघिक प्रकारत पटकावले होते, त्यानंतर मिश्र दुहेरीमध्ये त्याने दुसरे सुवर्णपदक पटकावले होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अचंताने पुरुष एकेरीमध्येही सुवर्णपदक पटकावले आणि गोल्ड मेडलची हॅट्रीक साधली. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तब्बल तीन सुवर्णपदकं जिंकवून देणारा अचंता हा एकमेव खेळाडू ठरला आहे. यावर्षी बर्मिंगहममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ७२ देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १६ देशांनाच तीनपेक्षा जास्त सुवर्णपदकं पटकावता आली आहेत. अचंताने या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानलाही जेवढी सुवर्णपदकं पटकावता आली नाहीत तेवढी एकट्या अचंताने पटकावली आहेत. पदक तालिकेमध्ये तीन सुवर्णपदकं पटकावणारा युगांडा हा देश १६व्या स्थानावर आहे. पण त्यानंतर एकाही देशाला तीन सुवर्णपदकं पटकावता आलेली नाहीत. अचंता शरथ कमल हा या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या जसपाल राणा आणि समरेश जंग यांनीही अशीच चमकदार कामगिरी केली होती. पण हे दोघेही नेमबाज होते. अचंता हा तीन सुवर्णपदक जिंकणारा पहिला टेबल टेनिसपटू ठरला आहे.

टेबल टेनिमध्ये भारताने एकूण चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी सात पदकांची कमाई केली. अचंथा शरथ कमालने सोमवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली, त्याचे हे १३वे पदक ठरले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील भारताचा सर्वाधिक पदकविजेता खेळाडू तो ठरला आहे. भारताने या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ६१ पदकं पटकावली आहे. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. भारताने यावेळी झालेल्या स्पर्धेत पदक तालिकेमध्ये चौथे स्थान पटकावले आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top