यंदा गुजरीची लाख मोलाची "दहीहंडी"

0

- माजी नगरसेवक किरण नकाते यांची माहिती

कोल्हापूर : नंदकुमार तेली

न्यू गुजरी मित्र मंडळाचे यंदाचे दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे 36 वे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दहीहंडी हा उत्सव कमी प्रमाणात व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला होता. या वर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून यंदाची "दहीहंडी" ही लाख मोलाची असणार आहे., अशी माहिती किरण नकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना किरण नकाते म्हणाले, दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे 35 वे वर्ष असून यामध्ये सातत्य राखून मंडळाने परंपरा जोपासली आहे. यंदाच्या वर्षी पारंपारिक उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दहीहंडी व कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी करवीर गर्जना झांज पथक, आधुनिक साऊंड, संगीत लाईट इफेक्ट, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या डान्स ग्रुपच्या नृत्याचे सादरीकरण होणार आहे. गुजरीची लाख मोलाची "दहीहंडी" कोल्हापुरात लक्षवेधी ठरेल असेही यावेळी त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना किरण नकाते म्हणाले, दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथक मंडळास रोख रुपये एक लाख रुपये बक्षीस तसेच 5 हजार रुपये रोख आणि सहा थर लावून सहभागी गोविंदा पथकांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रोत्साहन पर बक्षीस दिले जाणार आहे. तसेच महिला गोविंदा पथक सहभागी झाल्यास या पथकांना विशेष बक्षीस देण्याचा मानस आहे.

या पत्रकार परिषदेला कोल्हापूर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड, विजय हावळ , सत्यजित सांगावकर, मनोज बहिरशेठ, निखिल कटके, करवीर गर्जनाचे युवराज जोशी, अमर नकाते आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top