नवनीत राणा यांनी अमरावतीत सुरक्षा रक्षकांना बांधल्या राख्या

0

 

देशभरात आज रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, अमरावतीत सुद्धा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा साजरा केला. नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा आहे, तसेच अमरावती पोलिसांनी देखील नवनीत राणा यांना विशेष सुरक्षा दिली आहे, त्यामुळे आपल्या 24 तास सुरक्षेसाठी असलेल्या अमरावती पोलिसांना व सी एस एफ जवानांना नवनीत राणा यांनी राख्या बांधून त्यांना ओवाळून घातली व रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्यात. दुसरीकडे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलिस भगिनींनी राखी बांधली.राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिकता दिली.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top