“छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्हाला नको” – मराठा क्रांती मोर्चा

0
छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्हाला नको असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चा यांच्या समन्वयक यांनी मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कुणाचं नेतृत्व घेतलं नाही, त्यामुळे छत्रपती संभाजी राजेंनीही या संघटनाचे नेतृत्व करू नये, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

मराठा क्रांती मोर्चा यांना छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व नकोः
औरंगाबाद मध्ये मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद बोलवली होती. मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासन तर्फे गुरुवारी ही बैठक बोलण्यात आली होती. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये औरंगाबाद मधून सुनील कोटकर, चंद्रकांत भराट, सतीश वेताळ, भानुसे यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र बैठक सुरू होण्यापुर्वीच छत्रपती संभाजी राजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका नाहीतर मी बैठक सोडून जाईल, असं सांगितलं होतं. अशा प्रकारे प्रत्येकाचा आवाज दाबण्तयात गेल्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा द्वारे करण्यात आला आहे. या पत्रकार परिषद मध्ये अनेक मराठी नेत्यांची उपस्थिती होती.
रात्रीच्या अंधारात बैठका का घेता?
छत्रपती संभाजी महाराज अंधारात बैठकी का घेतात? असा सवाल करण्यात आला आहे. नेतृत्व सर्वसमावेशक असलं पाहिजे, पहिल्यापासूनच सगळे एकत्र होते, कालच्या बैठकीमध्ये एकही माणूस नव्हता, आमचं कोणीही नेतृत्व नाही, छत्रपती शिवराय हेच आमचे नेतृत्व. तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारात घेता, सर्व व्यापक बैठका का घेत नाही? सर्वांना का बोलवत नाहीत? मोजक्या चेहऱ्यांसमोर काय चर्चा चालवली आहे? छत्रपती संभाजी नगरातून तू सुरू झालाय… मराठा नेत्यांचा वारंवार अपमान केला जातोय, त्यावर तुम्ही राजकीय पोळ्या भाजत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला पळता भुई थोडी होईल? छत्रपती संभाजी राजांच्या आजूबाजूची जी मंडळी आहे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हा धाव रचला जात असल्याचा आमच्या स्पष्ट आरोप आहे, असं मराठी क्रांती मोर्चाने यावेळी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top