अकाली हृदयविकाराच्या झटका येण्याच्या रोगावर मात करण्यासाठी रामबाण उपाय असलेली टीप-- डॉक्टर गीता कृष्ण स्वामी

0 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. त्यास सध्याची राहणीमानाची ,खाण्यापिण्याची जीवनशैली कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले आहे. संभाव्य हार्ट अटॅक वर मात करण्यासाठी माणसाने काही पर्यायी मार्गाच्या टीप लक्षात ठेवणे अनिवार्य झाले आहे असे डॉ. गीता कृष्णस्वामी यांचे मत आहे. माणूस एकाकी असताना जर त्याच्या छातीत दुखायला लागले त्याबरोबर तीव्र वेदनेसह अस्वस्थ झाला असेल तर त्याने स्वतःची शारीरिक चेतना गमवण्यापूर्वी दहा सेकंद अतिशय जोरजोरात वारंवार खोकल्याने त्याचे प्राण वाचू शकतात तसेच खोकला दीर्घकाळ व खोल असावा. खोल श्वासामुळे फुफ्फुसात ऑक्सिजन येतो व खोकल्याच्या हालचालीने हृदय पिळून, रक्तसंचारण चालू होते .त्यानंतर हृदयविकारग्रस्त असलेले व्यक्ती रुग्णालयापर्यंत पोहोचू शकण्यास मदत होते. बऱ्याच हृदयविकार ग्रस्त लोकांना या उपायाची माहिती नसते. अचानक अकाली आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावर, त्यावेळी काय करणे आवश्यक आहे हे रुग्णाला माहिती नसते व त्यावेळची हृदयविकारग्रस्त रुग्णाची परिस्थिती ही अनाकलनीय असते त्यामुळे हृदयविकार असलेल्या लोकांनी या टीप ची माहिती लक्षात घ्यावी. हा संदेश जनहितार्थ असून सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावा हा या संकल्पनेचा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top