महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवासाची सवलत

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 महाराष्ट्र राज्याच्या दिनांक २३/०८/२०२२ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यातील  ७५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे  तसेच राज्यातील ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये भाड्याच्या ५०% प्रवास सवलत देण्यात आली आहे . महाराष्ट्र शासनाच्या गृह  (परिवहन व बंदरे )विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी अ.शा. पत्र क्रमांक एस .टी .सी. ०८२२/ प्रक २२०/परि १ने तारीख २४/०८/२०२२ चे पत्रानुसार आदेश देण्यात आलेला आहे .महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे बाबतीत अत्यंत योग्य आणि चांगला निर्णय लवकरात लवकर घेऊन जेष्ठ नागरिकांना हा दिलासा दिलेला आहे .महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय कारणास्तव बऱ्याच वेळा एसटीने प्रवास करावा लागत असतो. त्यात एसटीची सध्याची भाडेवाढ ही ज्येष्ठ नागरिकांना परवडणारी नव्हती त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या महागाईच्या काळात औषध उपचाराच्या खर्चा शिवाय एसटीच्या प्रवासाचा खर्च पकवडणारा नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सदरहू निर्णयाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी त्याचे स्वागत केले आहे.


This news is co provided by Janpratisadnews 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top