शेअर मार्केटमधील बादशाह गेला ; राकेश झुनझुनवाला यांचे निधन...

0

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झाल्याची माहिती आहे. राकेश झुनझुनवाला हे गेल्या काही दिवसांपासूून आजारी असल्याची माहिती होती.


मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. बिग बुल अशी त्यांची ओळख होती. झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुगणालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं आहे.

राकेश झुनझुनवाला यांची बिग बुल अशी ओळख होती. त्यासोबत अक्सारा एअर या कंपनीची देखील त्यांनी स्थापना केली होती. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे देखील ते प्रवर्तक होते. त्यांची नेटवर्थ ५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.


This news is co provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top