शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, आता पुस्तकांनाच जोडणार वह्यांची पाने

0
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवरचं ओझं सोसवत नाही. लहान मुलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझ असलेलं दप्तर घेऊन शाळेत जाताना आपण पाहतो. मात्र हेच पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. अशातच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे.

दीपक केसरकर यांचा मोठा निर्णयः

सोमवारी केसरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाठ्यपुस्तकाची तीन भागात विभागणी केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाठ्यपुस्तकाची तीन भागात विभागणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र पुस्तकाची विभागणी केल्यानंतर सुदिधा ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच लिखाणासाठी वहिची पानं जोडण्याचा विचार सुरू आहे. वहीची पाने जोडल्यानंतर लिहिण्यासाठी अथवा नोट्स काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

पुस्तकांनाच जोडणार वहिची पानेः

दरम्यान, या निर्णयावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आहे. शालेय शिक्षण विभाग या प्रस्तावा संदर्भात विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा निर्णय अंतिम झाल्यास राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची मोठी सोय होणार असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top