“काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने द्या” ; दीपाली सय्यद यांची केंद्र सरकारला मागणी

0

 

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित बांधवांना आधी त्यांची नावे विचारली. त्यानंतर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सफरचंदाच्या बागेत काश्मिरी पंडित बांधवांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काश्मिरी पंडीतांना शस्त्र परवाने देण्याची मागणी केली आहे.


दीपाली सय्यद यांचे ट्वीट-

दीपाली सय्यद म्हणाल्या, “काश्मिरी पंडीतांवर वर्षानुवर्षे होणाऱ्या हल्ल्यांना लक्षात घेता केंद्र सरकारने त्यांना स्वरक्षणा करीता शस्त्र परवाने देऊन, सेल्फ डिफेन्सच्या ट्रेनिंगची सोय तातडीने करावी.”

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top